Chak De India Live Concert च्या
सर्व परवानग्या मिळण्यासाठी अर्ज वेळेत केले आहेत. आम्हास अद्याप परवानगी मिळाली नाही अद्याप परवानगी नाकारण्याचे देखिल लेखी कोणतेही कारण स्पष्ट होत नाही. आमचा कार्यक्रम अधिकृत आहे. आमच्याकडे गायकांचे अधिकृत पत्र, video क्लिप, 14 फेब्रुवारी कॅलेंडर mentioned, सलीम Merchant यांच्या Indtagram सोशल account मधून announcement. ह्या सर्व बाबी लक्षात घेता,
गेल्या ४ दिवसांपासून आमच्या उदात्त कार्यावर “फेक इव्हेंट” असे शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न my-nmc Instagram account वरुन केला जात आहे यामाध्यमातून उमंग महिला फाऊंडेशन चे नाव व कार्य बदनाम करण्यात येत आहे.
एका सामान्य महिलेनं ३५० वंचित मुलांच्या शिक्षणासाठी उभारलेला हा उपक्रम खोटा ठरवण्याचा प्रयत्न होत आहे — ही अत्यंत वेदनादायक व निंदनीय बाब आहे.
Chak De India Live Concert हा केवळ कार्यक्रम नाही…
तो ३५० मुलांच्या स्वप्नांचा आधार आहे.
तो त्यांच्या शिक्षणाचा श्वास आहे.
तो त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प आहे.
निस्वार्थ सामाजिक उपक्रमावर प्रश्न उपस्थित करणे हे आपल्या लोकशाही आणि मानवतेला काळिमा फासणारे आहे. शिक्षणाला धर्म नसतो. मुलांच्या भविष्यास सीमा नसतात.
प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत असा प्रकार घडतात हे संतापजनक आहे.
मी एक आई आहे… एक शिक्षिका आहे… आणि त्या ३५० मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे.
मी त्यांच्या भविष्यासाठी ठामपणे उभी आहे. कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही.
आपणा सोबत केलेला सर्व व्यवहार अधिकृत बॅक द्वारा आणि पारदर्शक पद्धतीनेच झाले आहेत
आपण सर्वांनी सत्य जाणून घ्या, आमचे कार्य पहा आणि निर्णय घ्या — ही नम्र विनंती.
आपला एक तिकीट म्हणजे एका मुलाच्या आयुष्यातील आशेचा दिवा आहे.
14 February 2026 Event थांबवत आहोत.
पुढील तीन दिवसात कार्यक्रमाची नवीन तारीख अथवा refund प्रकिया सुरू होईल.
नम्र विनंती सतत call करू नये कृपया गैरसमज नसावा.
– सौ. विद्या आहेर
अध्यक्ष, उमंग महिला फाऊंडेशन